शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:29 IST

BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी माईक आणि लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. "या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची, ही कसली निती?" असा सवाल करत महायुती सरकारला घेरलं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपा नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली. त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही. कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना हे सरकार माफ करणार नाही" असंही म्हटलं आहे.  

"उबाठाला आता हिंदू सण आठवले"

"हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली. त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले. सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाकाळात खिचडीचोर अशी प्रतिमा तुमची. वाईन शॉप आणि बियर बार आधी उघडलेत. आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिरांना टाळं लावणारे तुम्ही आणि आता आम्हाला सांगता... हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे." 

"कोणत्याही सणाला, उत्सवाला बंदी नाही"

"आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही. कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना देखील हे सरकार माफ करणार नाही. पण तुमचे उरलेसुरलेले आमदार आणि खासदार, तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील, म्हणून अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करत आहेत" असं राम कदम यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?"

आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं. "महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय... आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी 'माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम' दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे... या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? 'चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची', ही कसली निती?" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Ram Kadamराम कदमBJPभाजपाAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाHindutvaहिंदुत्वHoliहोळी 2025