शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Tauktae Cyclone: “भाजपने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, केवळ बोलत नाही करुन दाखवतो”: प्रविण दरेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:30 IST

Tauktae Cyclone: भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकातौक्ते चक्रीवादळाच्या मदतीवरून साधला निशाणा

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून वादळग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं. (bjp pravin darkar criticised thackeray govt over tauktae cyclone)

तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्त पालघरवासियांना भाजपाच्या आमदार मनिषाताई चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठविण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही संकट काळात कोकणवासीयांना मदत करत आमची जबाबदारी पार पाडत आहोत. मुंबई  शहराने अनेक संकट झेलली असून, याच संकटातून मुंबई उभी राहिली आहे. इतरांना उभं करण्याच काम केलं आहे, ही आपली संस्कृती, परंपरा असल्यामुळे परत एकदा आपण सर्वांनी मिळून काम करूया, मदतीचा विश्वास लोकांना देऊया, असे दरेकर म्हणाले. 

करून दाखवलं! ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; नियम पाळत देशासमोर आदर्श

वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्र्यांचा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहित ७०० कि.मी. असा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ३ दिवसीय दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेत, मच्छिमारांशी, बंगायतदारांशी संवाद साधला. त्यांचं दुःख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाही, यावरून सरकारचं जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहे, हे दिसून येत आहे. तसेच वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे, वादळ हे ४ तास थांबले होते परंतु मुख्यमंत्री केवळ ३ तास सुद्धा थांबू शकले नाही. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.  

“एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी

जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का

पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई प्रवास करतात म्हणून आणि आम्ही जमिनीवरून दौरा करतो अशी टीका मुख्यमंत्री करत असताना ते विसरत आहे का, की ते खासगी विमान घेऊन रत्नागिरी येथे गेले असून, विमानतळावरचं बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिस येथे जाऊन माहिती सुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्यांना विमानतळावर बोलावून बैठक घेतली. बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले अधिकाऱ्याना बोलवले आणि हेलिकॉप्टरने परत मुंबईला आले त्यामुळे स्वतः विमानाने जाऊन पंतप्रधानांना हावाई दौरा करतात, अशी टीका करताना मुख्यमंत्री जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का? असा खोचक सवाल दरेकर यांनी केला. 

‘ते’ कंपनीचं अधिकृत वक्तव्य नाही; सरकारवरील टीकेनंतर सीरमचं स्पष्टीकरण

जनतेच्या डोळ्यात धूळफेक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोटोसाठी कोकण दौरा करतात, असा आरोप करत असताना तुम्ही येथे येऊन एक फोटोसाठी तीन दिवस शासनाची यंत्रणा कामाला का लावली? मुख्यमंत्री कोकणात येणार म्हणून तीन चार दिवस सर्व अधिकारी कोकणातले कामावर होते. तुम्ही जर आला नसता तर त्या ३-४ दिवसांत अधिकाऱ्यानी कोकणवासीयांना काहीतरी दिलासा दिला असता. तसेच पंचनामे झाल्यावर मदत करू, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले असता तुम्ही गेला तेव्हा पंचनामे झाले नव्हते का? असा सवाल करत दरेकर म्हणाले, मी आणि देवेंद्र फडणवीस गेलो होतो तेव्हा अधिकाऱ्यांनी ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. तसेच जेव्हा आपत्ती येते, तेव्हा तात्काळ मदत करायची असते, परंतु दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री करू शकले नाही. केवळ दिखाऊपणा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक राज्य सरकार करत असल्याची टीका दरेकर यांनी केली. 

गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

भाजप मदत करण्यास सक्षम    

कोकणमध्ये नितेश राणे यांच्या मार्फत २ ट्रक पत्रे आणि कवलं कोकणवासीयांना देण्यात आली. अजूनही सामान भाजप नुकसानग्रस्त लोकांसाठी पाठवत आहे, शेवटी हा आधार संकट काळात राज्यसरकारकडून मिळणं आवश्यक आहे परंतु, तोच आधार, मदत भाजप देत आहे. भाजपमध्ये सर्व आमदार, कार्यकर्त्यांना माणुसकी, सामाजिक बांधिलकी आहे याचा मला अभिमान आहे, असे दरेकर म्हणाले.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण