शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 22:52 IST

हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जनक्षोभामुळे धनंजय मुंडेंना दोन दिवसांपूर्वी आपलं मंत्रिपद सोडावं लागलं.

BJP Pankaja Munde: भाजप नेत्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांची त्यांच्या सातपुडा या निवासस्थानी भेट घेतली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जनक्षोभामुळे धनंजय मुंडेंना दोन दिवसांपूर्वी आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी आज त्यांची भेट घेत चर्चा केली आहे.

धनंजय मुंडे हे सध्या वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर मोठ्या आव्हानांचा सामना करत आहेत. एकीकडे त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तसंच मुंडे यांना Bell's palsy नावाच्या आजाराचेही निदान झाले आणि दुसरीकडे, त्यांच्या निकटवर्तीयाचा क्रूर हत्याकांडात सहभाग आढळला. या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी झाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. अशा संकटकाळात बहीण पंकजा मुंडे यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्याचे समजते.

दरम्यान, २००९ पासून धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंशी राजकीय संघर्ष सुरू होता. मात्र २०२३ मध्ये राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत गेला. त्यानंतर मुंडे बहीण-भावाच्या राजकीय नात्यातही बदल झाला. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय यांनी पंकजा मुंडेंचं तर विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय यांचं काम केलं. त्यामुळे दोघांमधील राजकीय दरी दूर झाल्याने ते एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असल्याचं दिसत असून पंकजा मुंडे यांनी आज घेतलेली धनंजय मुंडे यांची भेट त्याचाच एक भाग मानला जात आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाल्या होत्या पंकजा?

धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार्‍या नेत्यांना चिमटा काढला होता. "धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याच्या निर्णय योग्य आहे. त्याचे मी स्वागत करते, योग्य निर्णय. देर आए दुरुस्त आए, असंच म्हणावे लागेल. मुळात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती. असे झाले असले तर पुढील प्रकार टळला असता. शिवाय त्यांचा राजीनामा घेणाऱ्यांनी देखील तो राजीनामा अगोदरच घ्यायला हवा होता," असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण