Nitesh Rane : "बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा"; नितेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 09:56 AM2021-11-16T09:56:54+5:302021-11-16T10:21:13+5:30

BJP Nitesh Rane And Shivsena Aaditya Thackeray : नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

BJP Nitesh Rane Slams Thackeray Government And Shivsena Aaditya Thackeray Over maharashtra issues | Nitesh Rane : "बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा"; नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane : "बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा"; नितेश राणेंचा टोला

Next

मुंबई - भाजपा नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. "बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून टि्वट करत आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "पेंग्विनची स्कॉटलंडवारी, उपाशीपोटी शेतकरी-कामकरी" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र येथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती उभ्या असलेल्या दाखवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. नितेश राणे यांनी Penguin हा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी देखील राणे यांनी अनेकदा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे आवाहन केले. तर, दुसरीकडे भाजपा नेते संपाला पाठिंबा देत संपाच्या ठिकाणी जाऊन आपला पाठिंबा देत आहेत. आमदार नितेश राणे यांनीही संपाला पाठिंबा दिला. त्यावेळी, मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधला. 

'ST कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, प्रश्न मार्गी लावा'

भाजप सरकारमध्ये दिवाकर रावते हे कोणाच्या मांडीला मांडी लावू बसले होते. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही परिवहन महामंडळ शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी का आग्रही मागणी केली नाही. शिवसेनेची एसटीमध्ये कामगार संघटना आहे, त्यांनीही का बोलले नाही. उगाच, भाजपकडे बोट दाखविण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तसेच, विलिनीकरणाला वेळ लागणार आहे, मग एक दिवसांच विशेष अधिवेशन बोलवा. उद्या किंवा परवा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार येतो, एकमुखी पाठिंबा देतो, एक आमदार विरोध करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी मुंबईतच हे अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असेही राणे म्हणाले.  
 

Web Title: BJP Nitesh Rane Slams Thackeray Government And Shivsena Aaditya Thackeray Over maharashtra issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.