Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm Layoffs: पेटीएममधून होऊ शकते ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या केव्हा आणि का?

Paytm Layoffs: पेटीएममधून होऊ शकते ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या केव्हा आणि का?

Paytm Layoffs: मोठ्या संकटाचा सामना करत असलेली पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स आपल्या ५००० ते ६३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर आलीये. पाहा काय आहे यामागचं कारण.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:53 PM2024-05-24T13:53:01+5:302024-05-24T13:54:40+5:30

Paytm Layoffs: मोठ्या संकटाचा सामना करत असलेली पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स आपल्या ५००० ते ६३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर आलीये. पाहा काय आहे यामागचं कारण.

paytm-layoffs-one97-communications-may-terminate-5000-to-6300-of-its-employees-know-reason-rbi-impact-share-price-down | Paytm Layoffs: पेटीएममधून होऊ शकते ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या केव्हा आणि का?

Paytm Layoffs: पेटीएममधून होऊ शकते ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या केव्हा आणि का?

Paytm Layoffs: मोठ्या संकटाचा सामना करत असलेली पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स आपल्या ५००० ते ६३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर आलीये. दुसरीकडे, आज त्यांचा शेअरही  ४.५५ टक्क्यांनी घसरून ३४०.०५ रुपयांवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात सुमारे ६२ टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ४७ टक्क्यांहून अधिक घसरलाय.
 

का होणार कर्मचारी कपात?
 

कंपनीच्या या कठोर निर्णयामागील कारण म्हणजे या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांचा खर्च कमी करणं हा आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुमारे १५ ते २० टक्क्यांची कपात करू शकते. म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५००० ते ६३०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. वन९७ कम्युनिकेशन्सचे ४०० ते ५०० कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.
 

केव्हा होणार कपात?
 

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये वन९७ कम्युनिकेशन्सच्या पेरोलवर सरासरी ३२,७९८ कर्मचारी होते. त्यापैकी २९ हजार ५०३ कर्मचारी सक्रीयपणे कार्यरत होते. आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांचा एकूण खर्च ३४ टक्क्यांनी वाढून ३,१२४ कोटी रुपये झाला आहे. डिसेंबरमध्ये एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून कपातीची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
 

पेटीएमला चौथ्या तिमाहीत ५५० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे, जो गेल्या वर्षी १६८ कोटी रुपये होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर मार्च तिमाहीत कंपनीला कामकाजातून मिळणारं उत्पन्न तीन टक्क्यांनी कमी होऊन २,२६७ कोटी रुपयांवर आलंय. 
 

दरम्यान, पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी आपल्या शेअर धारकांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी गव्हर्नन्स फ्रेमवर्क मजबूत करणं, खर्चाची कार्यक्षमता सुधारणं आणि नियामक कारवाईमुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर होणारा परिणाम याबद्दल कंपनीच्या वचनबद्धतेबद्दल सांगितलं आहे.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात येत आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: paytm-layoffs-one97-communications-may-terminate-5000-to-6300-of-its-employees-know-reason-rbi-impact-share-price-down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.