शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Nitesh Rane : "...तेव्हा राणेंना संपवण्यासाठी संयमी, सुसंस्कृत पक्षप्रमुखांनी दिली होती सुपारी"; नितेश राणेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 11:12 IST

BJP Nitesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती" असं म्हटलं आहे. 

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यानंतर आता भाजपाचे नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुपारी दिली होती" असं म्हटलं आहे. 

"नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी संयमी आणि सुसंस्कृत पक्षप्रमुखांनी सुपारी दिली होती" असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरू करू असा इशाराही नितेश राणे यांनी ट्विटमधून दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

नितेश राणे यांनी "महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळी प्रतिमा घडवली जात आहे. ते आजारी आहेत, ते सोज्वळ आहेत, असं दाखवलं जात आहे. पण ते जर दुसऱ्याच्या जीवावर उठत असतील, दुसऱ्याला मारण्यासाठी सुपाऱ्या देत असतील तर असा माणूस स्वच्छ मनाचा नाही" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "योग्य वेळी सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली जाईल. काल सुहास कांदे यांनी जी घटना सांगितली. त्यानंतर मी ही माहिती समोर आणली आहे. फक्त एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ही गोष्ट झालेली नाही" असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"आज सगळीकडे फिरुन उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळाले पाहिजे की उद्धव ठाकरे नेमके कसे आहेत. स्वत:चे वडील आजारी असल्याची चिंता यांनी वाटते पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवून अटक करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना काही वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी धमक्या येत होत्या, त्यावेळी राणेसाहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता तासनतास घराच्या बाहेर राहून संरक्षण दिलं आहे. त्याच व्यक्तीला अशा सुपाऱ्या दिल्या" असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना