शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar vs Nana Patole: "काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 20:50 IST

भाजपाच्या आशिष शेलारांनी दिला इशारा, शिवसेनेलाही लगावला टोला

Ashish Shelar vs Nana Patole: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक विषय गाजत आहेत. नुकतेच अजय आशर यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचे दिसले. "केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नीती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच 'मित्र'ची स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली आहे. हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर, "नाना पटोले काय डोक्यावर पडलेत का?" असा संतप्त सवाल आशिष शेलारांनी केला.

"महाविकास आघाडीला  त्यावेळी आम्ही प्रश्न विचारला होता. तेव्हा नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. तत्कालीन प्रश्नावर आजही ठाम आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना क्लीन चिट का दिली? डोक्यावर पडल्यासारखे काँग्रेसने प्रश्न विचारू नये. जुन्या व्हिडिओ क्लिपवर प्रश्न विचारायचे असतील, तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठल्या भागाला लकवा लागला होता याचाही व्हिडिओ काढेन. काँग्रेसने शिवसेनेला हा वाघ नाही मांजर आहे असं म्हटलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे. जुन्या व्हिडीओवर प्रश्न विचारायचे असतील तर माझ्यापेक्षा गोची तुमची होईल," असा इशाराच आशिष शेलारांनी दिला.

दरम्यान, सेस इमारतीतील पुनर्विकासाला वर्षानुवर्षे वर्षात खीळ पडली होती. त्या समस्येतून दूर करण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रपती यांचे अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मुंबईकरांच्या दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे. संक्रमण शिबिराची अवस्था वाईट होत्या. राहतो तिथेच सोय होणार. आता सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे. सेस इमारतीतील मालकांची दादागिरी आता संपली. भाडेकरूच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला. मुंबईकरांचा आणि विशेषता भाडेकरूनचा दिवाळीचा दिवस असावा असा निर्णय झालेला आहे. अशी प्रतिक्रीया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारNana Patoleनाना पटोलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस