शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे”; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:02 IST

BJP Narayan Rane News: हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. कोणत्या विषयासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करायचा, ते माहिती नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

BJP Narayan Rane News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले. औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून महायुतीतील नेते काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनीही यावरून टीकास्त्र सोडले.

मीडियाशी बोलताना नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. हर्षवर्धन सपकाळ मूर्ख माणूस आहे. औरंगजेब कोण होता? महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. औरंगजेबाची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलणे योग्य नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. कोणत्या विषयासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करायचा आहे, त्या माणसाला माहिती नाही. हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाही, तर पक्ष बुडवण्यासाठी या माणसाची नेमणूक झालेली आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी सुनावले.

समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट

समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट आहे. त्याचा सर्व्हे होऊ देत, किती खाली तेलसाठा आहे समजू दे. मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, हर्षवर्धन सपकाळ यांची आताच नवीन नियुक्ती झाले आहेत. सरकारवर टीका करतो, हे दिल्लीला दाखवायला पाहिजे त्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. काँग्रेसने आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसने आपला पराभव असा का झाला? हे पाहिले पाहिजे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन शोधले पाहिजे. मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला पाहिजे, असा पलटवार उदय सामंत यांनी केला.

दरम्यान, आम्ही जो काही कारभार केला, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केला आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा होता, कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसBJPभाजपा