शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 12:36 IST

नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता; पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार

नवी दिल्ली: शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं शरसंधान साधणाऱ्या नारायण राणेंना मोदी सरकारकडून स्पेशल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. राणे त्यांच्या दिल्लीवारीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील.शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना भाजपपासून दूर गेली. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत मोदींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. हेच मंत्रालय राणेंना मिळण्याची शक्यता आहे. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सध्या या मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे २०१४ पासूनच अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे होतं. त्यावेळी अनंत गीते यांच्याकडे मंत्रालयाचा कार्यभार होता.दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान?राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. नारायण राणे सातत्यानं ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार करत आहेत. यासोबतच पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच सर्व ताकद पणाला लावली आहे. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

अमित शहांचा दौरा फलदायी?काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. या भेटीत शहांनी राणेंच्या कामाचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं अगदी तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेले राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्यानं शाब्दिक हल्ले करतात. राणे आक्रमक नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाArvind Sawantअरविंद सावंत