BJP Morcha: भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:54 PM2022-03-09T14:54:17+5:302022-03-09T15:00:09+5:30

आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले.

BJP Morcha: Devendra Fadanvis and other big BJP leaders arrested by Mumbai police, | BJP Morcha: भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

BJP Morcha: भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

googlenewsNext

मुंबई: नवाब मलिकांच्या (nawab malik) राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला. त्यानंतर आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा विधानभवनाकडे जात असताना पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतले.

आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर महिला नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, आझाद मैदानात बोलताना फडणवीसांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, पोलिसांनी मोर्चा अडवताच भाजप नेते स्वतःहून पोलिस व्हॅनमध्ये जाऊन बसले. या नेत्यांना कुठे नेणार, हे अद्याप समजू शकले नाही.

भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
भाजपच्या या मोर्चामध्ये भाजपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपने जोरदार घोषणाबाजी केली. भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना तेथून जाण्याचे आवाहन करण्यात आले, पण अजूनही आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा परिसरात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येते उपस्थित आहेत.

'उद्धव ठाकरे, एकदिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल'

आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. नवाब मलिक आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातलं मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल, असं फडणवीस म्हणाले.

'राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थकणार नाही'

तसेच तुम्ही आमच्याविरोधात षडयंत्र करत आहात. पण आम्ही घाबरणार नाही. एका नरेंद्र मोदीला संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला. परंतु जनतेचा आशीर्वाद असल्यानं ते जागतिक नेते झाले. आम्ही मोदींचे सैनिक आहोत. त्यांचा आशीर्वाद आमच्यामागे आहे. आमचे संबंध गुन्हेगारांशी नाही. आमच्याविरोधात कितीही षडयंत्र केले तर शिवरायांच्या आशीर्वादाने ते हाणून पाडू. आमच्याकडे अनेक बॉम्ब आहेत. योग्यवेळी तो फोडला जाईल. संघर्ष सुरू झाला आहे. पोलिसांशी संघर्ष करू नका. आपला संघर्ष पोलिसांशी नाही. अटक केली तरी अटक व्हा. जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर आम्ही थकणार नाही, झुकणार नाही आणि विकणारही नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  

 

 

Read in English

Web Title: BJP Morcha: Devendra Fadanvis and other big BJP leaders arrested by Mumbai police,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.