शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:16 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जोरदार खलबते सुरू : सत्तास्थापनेसाठी मुंबईत जोरदार घडामोडी..

ठळक मुद्दे१०५ आमदारांना ‘५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजप-सेना युतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँगे्रस -काँगे्रस आघाडीमध्ये सत्तास्थापनेसाठी जोरदार खलबते सुरू आहेत. मुंबईमध्ये सर्वच पक्षांमध्ये क्षणाक्षणाला घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व १०५ आमदारांना ‘५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर भाजपचे सर्व आमदार मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा, तर मित्रपक्ष शिवसेनेला केवळ ५४ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपला स्पष्ट बहुतम मिळण्याची अपेक्षा होती; परंतु निवडणूक निकालानंतर सेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी मुख्यमंत्रिपद कुणाला, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राज्यात सुमारे २४ अपक्ष आमदार निवडून आले असून, त्यांपैकी जास्तीत जास्त आमदारांचा पांठिबा मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना यांचा प्रयत्न सुरू आहे. तर, राष्ट्रवादी काँगे्रसने शिवसेनेचादेखील मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी गुगली टाकून राजकारण आणखीच पेटवून दिले आहे. काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीत पक्षनेत्यांची भेट घेऊन पुढील वाटचाल ठरवत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकारण ऐन हिवाळ्यात तापले आहे.मुंबईत सुरू असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत एकाही आमदाराने मुंबई सोडू नये, असे आदेश दिले आहेत.  मुंबई-पुणे दोन तासांच्या अंतरावर असूनदेखील पक्षाध्यक्षांमुळे पुण्यातील सहा आमदारांनादेखील मुंबईतच मुक्काम करावा लागत आहे.    .........पक्षाच्या वतीने सर्व आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत एकाही आमदाराने मुंबई सोडून जाऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु, गुरुवारी (दि. ३१) महापालिकेची स्थायी समितीची पूर्वनियोजिक बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे आवश्यक असल्याने  मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची परवानगी घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहिलो आहे.  - सुनील कांबळे, नवनिर्वाचित आमदार व स्थायी समितीचे अध्यक्ष

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाGovernmentसरकारMLAआमदारMumbaiमुंबई