संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:12 IST2025-03-04T10:11:11+5:302025-03-04T10:12:31+5:30

ज्याला मन आहे तो प्रत्येक माणूस हे दृश्य पाहून रडला असेल. जल्लाद, राक्षस, हैवान यासगळ्या पलीकडे ही घटना घडली आहे असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं.

BJP MLA Suresh Dhas, Chitra Wagh angry after photo of Beed Santosh Deshmukh murder case, targeting Dhananjay Munde | संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले

मुंबई - बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात वादंग सुरू आहे. त्यातच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी केलेली कृत्य सोशल मीडियातून समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या गुन्हेगारांबद्दल सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात भाजपा आमदार चित्रा वाघ यादेखील संतोष देशमुखांचे फोटो पाहून भडकल्या आहेत. 

चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या. जनावर पण एखाद्याचा असा बळी घेत नाही. आका,आकाचे आका आणि कोण कोण यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुंतले असतील तर तेही उचलून बाहेर फेकून द्या. माणसं नाहीतचं ही..हे तर हैवान अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

तर सुरुवातीपासून मी जे सांगत होते हे इतकं महाभयंकर आहे. जल्लाद, राक्षस, हैवान यासगळ्या पलीकडे ही घटना घडली आहे. चार्जशीट बाहेर आल्यानंतर मी १६ डिसेंबरला जे भाषण केले त्यातील सर्व मुद्दे तंतोतंत बाहेर आलेत. अजितदादांनी तात्काळ धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा. राज्यातील जनतेने व्हिडिओ पाहिला आहे. ज्याला मन आहे तो प्रत्येक माणूस हे दृश्य पाहून रडला असेल. मी ज्या ज्या मागण्या केल्या त्यावर मुख्यमंत्र्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री १०० टक्के धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील हा विश्वास भाजपा आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, इतके भयानक हे लोक आहे. या लोकांना पुढच्या ३-६ महिन्यात किंवा वर्षभरात फाशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्‍यांनी फास्टट्रॅकमध्ये हा खटला चालवावा. मुख्यमंत्र्‍यांनी या प्रकरणात कुणालाच सोडले नाही. ही घटना खंडणीमुळे झाली आहे. सातपुडा बंगल्यावर खंडणीबाबत बैठक झाली होती की नाही याचे उत्तर धनंजय मुंडे यांना द्यावेच लागेल. एसआयटीच्या चार्जशीटची ६४ पाने माझ्याकडे आहेत. अजून अतिरिक्त चार्जशीट दाखल केली जाणार आहे. मस्साजोग गावकऱ्यांनी आणि धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाने जी मागणी केली आहे त्या सरकारने मान्य केल्या आहेत. या घटनेतील उर्वरित आरोपी आहे त्यांनाही अटक झाली पाहिजे असं आमदार सुरेश धस यांनी सांगितले. 

मनसेनेही केली फाशीची मागणी

हैवानाला सुद्धा शरम वाटेल अशी संतोष देशमुख यांची अमानुषपणे छळ करून हत्या करणाऱ्या राक्षसांना  फाशी द्या. मुख्यमंत्र्‍यांनी गुन्हेगारांना कायद्याची ताकद दाखवा अशी मागणी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे. 

Web Title: BJP MLA Suresh Dhas, Chitra Wagh angry after photo of Beed Santosh Deshmukh murder case, targeting Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.