शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane Letter: "मुंबईला 26 जुलैची आठवण येईल की काय?"; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:15 IST

Nitesh Rane Letter: "मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही."

मुंबई: हवामान विभागाने यंदा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याची राजधानी मुंबईत पावसामुळे सामान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. यावरुन भाजप आमदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. यात त्यांनी 26 जुलैच्या परिस्थितीचीही आठवण करुन दिली आहे.

नितेश राणे काय म्हणाले?मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात नितेश राणे म्हणतात की, "पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे".

'26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल '"यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याची ठिकाणं आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त मांटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील 25 फ्लडींग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.''

'आपण काय उपाय योजना केल्या आहेत?'"पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्सजवळ पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत?, हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?", असा टोला राणेंनी लगावलाय.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊसMumbaiमुंबई