शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

५०० मधून १०० जागा, पास होत नाय..! मस्ती आलीय काय?; रॅपच्या माध्यमातून मविआवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 00:29 IST

रॅपच्या माध्यमातून महायुतीचा महाविकास आघाडीवर निशाणा, भाजपा आमदाराकडून ट्विट करत रॅप व्हायरल 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हमुळे महायुतीला फटका झाला असा आरोप सातत्याने महायुतीकडूनमहाविकास आघाडीवर केला जात आहे. लोकसभेत राज्यात महाविकास आघाडीच्या ४८ पैकी ३१ जागा निवडून आल्या तर मिशन ४० प्लस रणनीतीवर काम करणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता महायुतीकडून विधानसभेत मविआला धोबीपछाड देण्यासाठी सर्वच प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे.  एका रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या रणनीतीवर टीका करण्यात येत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हे रॅप शेअर केले आहे.

या रॅपच्या माध्यमातून मविआच्या फेक नरेटिव्हवर भाष्य करण्यात आले आहे. खोटं बोलून मतं मिळाली म्हणून मस्ती आली काय असा सवाल या रॅपच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. हे रॅप साँन्ग सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हे रॅप ट्विट करत एकदम कडक असं कौतुक केले आहे. 

रॅपमध्ये नेमकं काय?

मस्ती आलीय काय.. असं म्हणत या रॅपमधून उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले, संजय राऊत, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवारांचा फोटो लावण्यात आला आहे. खोटं बोलून मतं मिळाली, मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय...५०० मधून १०० जागा, पास होत नाय..१०-२० जागा वाढल्या म्हणून सत्ता येत नाय...अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोचक टीका करण्यात आली आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक आहेत. त्यात सगळेच पक्ष आपापली रणनीती आखत आहेत. मविआला लोकसभेत मिळालेलं यश पाहून महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला दिला जाणार आहे. मात्र या योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येते. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुतीNitesh Raneनीतेश राणे maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४