'राणे, सिर्फ नाम हि काफी है, आजही राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 18:05 IST2021-08-27T17:55:48+5:302021-08-27T18:05:19+5:30
Nitesh Rane slams shivsena: शिवसेनेच्या मोहसीन शेखची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना सहसचिव पदी नियुक्ती केली.

'राणे, सिर्फ नाम हि काफी है, आजही राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात...'
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे. राणेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. त्यात अग्रेसर असणाऱ्या शिवसेनेच्या मोहसीन शेखची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना सहसचिव पदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरुन नितेश राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसेनेकडून राणेंच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार निदर्शन केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला. त्या लाठीचार्जमध्ये शिवसेना कार्यकर्ते मोहसीन शेख यांना जबर मारहाण झाली. त्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले.
“राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या 'त्या' युवासेना कार्यकर्त्याची बढती”
— nitesh rane (@NiteshNRane) August 27, 2021
आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात!! 😊
सिर्फ नाम हि काफी है!!! 😊 pic.twitter.com/9Mcwn4n1z1
या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी मोहसीन शेख यांची युवासेना सहसचिव म्हणून नियुक्ती केली. त्या नियुक्तीवरुन निशाणा साधत आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर केला. तसेच, त्या फोटोसोबत 'आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात!! सिर्फ नाम हि काफी है!!!' असे लिहित शिवसेनेवर जोरदार टोला लगावला आहे.