शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'हा कार्टा सिंधुदुर्गाच्या मातीत कसा जन्मला हेच कळत नाही'; नितेश राणेंची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 16:23 IST

'मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो.'

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्या, तर काहींची प्रकृती खराब झाली. दरम्यान, याच संपावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh rane)  यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Strike) सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन नितेश राणेंनी आंदोलकांची भेट घेतली आणि माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. 'अनिल परबसिंधुदुर्गातील आहेत, पण आमच्या मातीत हा कार्टा कसा जन्मला हेच कळत नाही. मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. 

वसुली करुन उद्धव ठाकरेंना द्यावी लागतेराणे पुढे म्हणाले, अनिल परब यांना बदाम पाठवा, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्याला काही कळत नाही. हा जी वसुली करतो ती सर्व उद्धव ठाकरेंना द्यावी लागते. उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया झाली. पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का? असा प्रश्न पडतो. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नाही. विलीनीकरण झाले तर अनिल परब वसुली कशी करणार? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली. 

कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पेटवून देऊराणे पुढे म्हणतात, कर्मचाऱ्यांनो तुम्ही आत्महत्या का करता? सरकारमधील एक ते दोन लोकांना घेऊन जाऊ की. तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र पेटवू. आपण शिवरायांच्या राज्यात राहतो, आत्महत्या हा पर्याय नाही. 93च्या ब्लास्टमधील मंत्री सरकारच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. जर कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ नितेश राणे सोबत आहे. निलंबन केल्यानंतर हे मंत्री कसे राज्यात फिरतात ते आम्ही बघतो, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Anil Parabअनिल परबST Strikeएसटी संपsindhudurgसिंधुदुर्ग