शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 केंद्र सरकारला भाजपा आमदार जयकुमार रावल यांचाच घरचा आहेर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 16:23 IST

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या समोरच खासदार भामरेंना सुनावलं

Jayakumar Rawal,  केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण धोरणाला भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य मोबदला द्या अन्यथा धुळे ते नरडाणा रेल्वे नाही तरी असे खडे बोल जयकुमार रावल यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोरच खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सुनावले. धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी व धुळे नरडाणा रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जात आहेत. मात्र या जमिनींना योग्य मोबदला दिला जात नसल्याने आमदार जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण धोरणाला विरोध दर्शविला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला.

यावेळी आमदार जयकुमार रावल म्हणाले की दोन लाखात तर शिंदखेड्यात प्लॉटही मिळत नाही अन् शेतकऱ्यांच्या जमिनींना हेक्टरी पाच लाख रुपयाचाच भाव लावतात त्यामुळे प्रकल्पांसाठी शेतकरी कशाला आपल्या जमिनी देतील. आणी म्हणून खासदार साहेब तुमचा पंतप्रधान कार्यालयाशी तगादा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळून द्यावा. एकीकडे शेतीसाठी पाणी येणार असल्याचे स्वप्न दाखवून अन् शेतकऱ्यांजवळ जमिनीत राहणार नाही त्याचा काय उपयोग त्यामुळे उद्योग आणा पण रिकामे उद्योग आणू नका असे देखील खडे बोल रावल यांनी सुनावले आहे.

चांगले उद्योग यायला पाहिजे, परंतु लोकांच्या जीवावर उदार होतील असे प्रकल्प देखील आमच्या काही कामाचे नाही तसेच धुळे नरडाणा रेल्वे मार्ग झालाच पाहिजे परंतु, तो शेतकऱ्यांच्या जीवावर नाही शेतकऱ्यांना योग्य असा मोबदला मिळाला तरच झाली पाहिजे नाहीतर नाही झाली तरी चालेल. अशा शब्दात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहणाच्या धोरणावरून सुनावले.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावलBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवेDhuleधुळे