धुळ्यामध्ये भाजपात फूट, आ. अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:19 IST2018-11-20T16:27:39+5:302018-11-20T18:19:27+5:30
धुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचे पर्यावसान अखेर पक्षात फूट पडण्यामध्ये झाले आहे.

धुळ्यामध्ये भाजपात फूट, आ. अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
धुळे - धुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचे पर्यावसान अखेर पक्षात फूट पडण्यामध्ये झाले आहे. महानगरपालिका निवडणुक प्रक्रियेतून डावलल्याने नाराज असलेले स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी नव्या पक्षाची घोषणा करत भाजपाला थेट आव्हान दिले आहे. आता धुळे महानगरपालिका निवडणुकीत अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे ह्या महापौर पदाच्या उमेदवार असतील.
भाजपाकडून दगाफटका झाल्याने आपण नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे गोटे यांनी सांगितले. धुळे महापालिकेची निवडणूक येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोटे यांचे मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. यामुळे गोटे यांनी आक्षेप घेतलेला व राजीनामा देण्याची घोषणा केली होती. रविवारी गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आपले आक्षेप मांडले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून, धुळे महापालिकेची निवडणूक गोटे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष दानवे गोटे यांच्या समस्या सोडवतील असेही सांगितले होते. मात्र या वादावर तोडगा न निघाल्याने गोटे यांनी अखेरीस नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली.