Ganesh Naik On Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. यातच भाजपाच्याच एका मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला घरचा अहेर दिला. विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना, लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याचे मत या मंत्र्यांनी व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडे सगळ्या जंगलात आहेत. आदिवासी पाडे, धनगर वाडे असतील आपण रस्ते करणार नाही असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गावे जोडण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करणार आहोत. धनगरवाडे जोडण्यासाठी मोहीम घेता येईल का? कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा सगळीकडे धनगरवाडे आहेत. परवा एक बातमी आली तीन किलोमीटर रुग्ण खांद्यावरुन न्यावा लागला. यात वनविभागाने जबाबदारी घेऊन काय करता येईल का, असा प्रश्न काँग्रेस सदस्य सतेज पाटील यांनी विचारला. याला वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिले.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय
गणेश नाईक यांनी उत्तर देताना सांगितले की, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हे कॉर्पोरेशन सुरू केल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे. कापण्यासाठी उपलब्ध असलेली सागाची संपत्ती १२ हजार कोटीची आहे. राज्य शासनाने विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले, त्याच्यात लाडकी बहीण योजना स्वीकारली, लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याची परिस्थिती आहे. परंतु, असे असले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, या बारा हजार कोटींच्या संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून सहा हजार कोटींचे कर्ज घ्यावे. वन खात्याला सहा हजार कोटी जर उपलब्ध झाले तर हिरवे डोंगर, सप्त रंगाचे डोंगर,सुगंधी रस्ते, त्याच बरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे पगार याबाबतचे प्रश्न सुटतील. वाड्यांच्या रस्त्यांसाठी निश्चित प्रयत्न केले जातील. मात्र, व्याघ्र प्रकल्पातून मानवी वस्तू दूर केल्यास संघर्ष होणार नाही. पर्यायी शेती देण्याबाबत विचार करावा लागेल, असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
Web Summary : BJP minister Ganesh Naik claims Ladki Bahin scheme impacts other departments. He suggests leveraging forest assets for development and staff salaries. While acknowledging issues, Naik clarified the scheme won't be discontinued, addressing rural road concerns.
Web Summary : भाजपा मंत्री गणेश नाइक का दावा है कि लाड़की बहिण योजना अन्य विभागों को प्रभावित करती है। उन्होंने वन संपत्तियों का उपयोग विकास और कर्मचारियों के वेतन के लिए करने का सुझाव दिया। मुद्दों को स्वीकार करते हुए, नाइक ने स्पष्ट किया कि योजना बंद नहीं की जाएगी, ग्रामीण सड़क चिंताओं का समाधान किया जाएगा।