भाजप नेत्याचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न, रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:00 PM2023-12-15T22:00:48+5:302023-12-15T22:01:19+5:30

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

BJP local leader's attempt to kill his girlfriend, Rupali Chakankar's tweet | भाजप नेत्याचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न, रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ

भाजप नेत्याचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न, रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. भाजपच्या पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षाने त्याच्या मित्र्यांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक दावा रुपाली चाकणकर यांनी ट्विटमधून केला आहे. या प्रकरणातील पीडित तरुण जखमी असून, अत्यंत मानसिक तणावाखाली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
आपल्या ट्विटमध्ये चाकणकर म्हणतात, 'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे', अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

Web Title: BJP local leader's attempt to kill his girlfriend, Rupali Chakankar's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.