bjp leader ram kadam criticize congress over various issues shiv sena | वर्षभरात सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले; राम कदम यांची टीका

वर्षभरात सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले; राम कदम यांची टीका

ठळक मुद्देकाँग्रेसचा स्वाभिमान संपला असल्याची कदमांची टीका

काँग्रेसनं आपला स्वाभीमान गमावला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, १२ महिन्यांमध्ये सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले आहेत, असं म्हणत भाजपा नेते राम कदम यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरूनही राजकारण सुरू आहे. 

"काँग्रेसला सत्तेची इतकी हा आहे की महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्षपदही काँग्रेसचे कार्यकर्ता किंवा राहुल गांधी किंवा सोनिया गांधी या ठरवणार नाहीत. तेदेखील शिवसेना ठरवेल? काँग्रेसच्या स्वाभिमान संपला आहे," असं म्हणत कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध

"महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल," असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलं होतं. "आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल," असं बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंल होतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader ram kadam criticize congress over various issues shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.