शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

Pankaja Munde Corona Positive : भाजप नेत्या पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 21:50 IST

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी पंकजा यांची प्रकृती चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.

मुंबई - माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. यापूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्यावर्षी मार्च महिन्यात पंकजा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समजते. (Pankaja Munde second time Corona Positive)

यासंदर्भात, स्वतः पंकजा मुंडे यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आधीच सावधगिरी बाळगत आयसोलेट झाले आहे. मी अनेक लोकांना भेटले आणि कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही मी भेटले. तेथूनच मला पुन्हा कोरोनाची लागण झाली असावी. जे माझ्यासोबत होते त्यांनी कृपया आपापली चाचणी करून घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, अशा आशयाचे ट्विट पंकजा यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. यातच नेते मंडळी बड्या-बड्या विवाहसोहळ्यांना आणि राजकीय कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत आहेत. राज्यात आतापर्यंत डझनावर नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनाही एका राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्यातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पंकजा मुंडे भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहणासाठी धमधम येथे होत्या उपस्थित -गेल्या चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमासाठी त्या धमधम येथे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांसोबतच व्यासपीठावरच जेवणही केलं आणि अनेकांनी त्यांना भेटून फोटोही काढले.

भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे... 

ऐन कोरोना काळात भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमासाठी जमलेला जनसमुदाय... 

भगवानबाबा मंदिराचा कलशारोहणासाठी पंकजा हेलिकॉप्टरने पोहोचल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले होते...

या नेत्यांना कोरोनाची लागण -माजी मंत्री दिपक सावंतशिक्षण मंत्री वर्षा गायकवाडखासदार सुप्रिया सुळेमहसूलमंत्री बाळासाहेब थोरातमहिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूरआदिवासी मंत्री के. सी. पाडवी आमदार सागर मेघेआमदार राधाकृष्ण विखे पाटीलऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेआमदार इंद्रनील नाईकआमदार शेखर निकमआमदार माधुरी मिसाळमाजी मंत्री हर्षवर्धन पाटीलआमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपा