Nilesh Rane: "4 वेळा मुख्यमंत्री, 20 वर्षे केंद्रात मंत्री, तरीदेखील...", निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:24 AM2022-05-11T09:24:14+5:302022-05-11T09:24:20+5:30

Nilesh Rane: "तेव्हा तुम्ही काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं."

BJP Leader Nilesh Rane slams NCP president Sharad Pawar over uemployment and farmer issue | Nilesh Rane: "4 वेळा मुख्यमंत्री, 20 वर्षे केंद्रात मंत्री, तरीदेखील...", निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका

Nilesh Rane: "4 वेळा मुख्यमंत्री, 20 वर्षे केंद्रात मंत्री, तरीदेखील...", निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका

Next

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधीपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक पाहायला मिळते. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राज्यातील परिस्थितीवरुन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

'...तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं'
निलेश राणे अनेकदा ट्विटरवरुन सत्ताधारी नेत्यांवर टीका करत असतात. आता त्यांनी ट्विटरवरुन शरद पवारांवर निशाणा साधलाय. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "4 वेळा मुख्यमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, 50 वर्षे आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष. तरीदेखील पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं," अशी खोचक टीका राणेंनी केली

“मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत”
दुसऱ्या एका ट्विटमध्ये निलेश राणेंनी नवनीत राणा यांच्या फोटोवरुन शिवसेनेवर निशाणा साधला. "मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामे पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही. म्हणूनच शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीनमध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे," असे निलेश राणे म्हणाले.
 

Web Title: BJP Leader Nilesh Rane slams NCP president Sharad Pawar over uemployment and farmer issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.