खोतकरांसारखे 'लुक्के' आम्ही कपडे शिवायला ठेवतो; निलेश राणेंची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 15:21 IST2020-03-02T15:18:40+5:302020-03-02T15:21:18+5:30

तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला होता.

BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena leader Arjun Khotkar | खोतकरांसारखे 'लुक्के' आम्ही कपडे शिवायला ठेवतो; निलेश राणेंची जहरी टीका

खोतकरांसारखे 'लुक्के' आम्ही कपडे शिवायला ठेवतो; निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई : राणे कुटुंब आणि शिवसेना नेत्यांचे राजकीय आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाही. तर तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा टोला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपचे नेते निलेश राणेंना लगावला होता. यावरूनच निलेश राणेंनी आता खोतकरांना प्रत्युत्तर दिले आहे. खोतकर यांच्यासारख्या लोकांना आम्ही कपडे शिवायला ठेवतो असे म्हणत त्यांनी जहरी टीका केली.

नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना, "आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली होती”, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना खोतकर म्हणाले होत की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांना सर्व काही मिळाले असून यांचे नाव लौकिक झाले. असे उपरे लोकं खाल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच आशु शकत नाही. तर तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला होता.

निलेश राणे यांनी यावर ट्वीट करत म्हंटलं आहे की, “बरोबर आहे अर्जुन खोतकरांसारखे लुक्के आमची उंची मोजणारच, कारण त्यांच्यासारखे आम्ही कपडे शिवायला ठेवतो. तुझी उंची कळली आम्हाला खोतकर, युती असून सुधा तू पडलास”, अशी जहरी टीका निलेश राणेंनी केली आहे.

Web Title: BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena leader Arjun Khotkar