शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

"आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा"; राणे समर्थकांचा राऊतांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:47 IST

कोकणातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेली टीका राणे समर्थकांना बरीच लागलेली दिसतेय. कारण आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराचा राणे समर्थकांनी राऊतांना दिला आहे.

ठळक मुद्देराणे समर्थकांचा राऊतांना इशाराराऊतांच्या टीकेनंतर राणे समर्थकांचा राडाराऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

रत्नागिरी : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर विशेषतः कोकणातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेली टीका राणे समर्थकांना बरीच लागलेली दिसतेय. कारण आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराचा राणे समर्थकांनी राऊतांना दिला आहे. (bjp leader narayan rane supporters warns shiv sena mp vinayak raut)

राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल. बुडत्याला काडीचा आधार, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. यावरुन राणे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. एवढेच नव्हे, तर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी विनायक राऊत यांना दिला आहे.

विनायक राऊत, भाषा बदलली नाहीत तर...; राणे नॉन मॅट्रिकवरून निलेश राणे संतापले

भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे, असेही विनायक राऊत म्हणाले होते. 

नारायण राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने विरोध केला नाही. याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्यात आली. राणेंच्या कंगालपणामुळे प्रस्ताव रखडला होता, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता. 

दरम्यान, नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांना प्रत्यूत्तर दिले. भाजपाच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की, काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल, आता नवीन थापा झालाय, असा जोरदार पलटवार निलेश राणे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत BJPभाजपाShiv Senaशिवसेना