विनायक राऊत, भाषा बदलली नाहीत तर...; राणे नॉन मॅट्रिकवरून निलेश राणे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 06:35 PM2021-02-09T18:35:59+5:302021-02-09T18:39:13+5:30

Narayan Rane, Nilesh Rane News: सिंधुदूर्गातील राज्यसभा खासदार नारायण राणेंच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्याने पुन्हा एकदा शिवसेना-राणे संघर्ष सुरू झाला आहे. नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच राणेंच्या पुत्राला पाडणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Nilesh Rane angry over Narayan Rane non-matric comment of MP Vinayak Raut | विनायक राऊत, भाषा बदलली नाहीत तर...; राणे नॉन मॅट्रिकवरून निलेश राणे संतापले

विनायक राऊत, भाषा बदलली नाहीत तर...; राणे नॉन मॅट्रिकवरून निलेश राणे संतापले

googlenewsNext

नारायण राणे नॉन मॅट्रिक असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली होती. त्यावर राणे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांना प्रत्यूत्तर दिले आहे. (Nilesh Rane gave Warning to Sindhudurg Shivsena MP Vinayak Raut)


भाजपाच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल आता नवीन थापा झालाय अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला बंदोबस्त करतो आणि सिंधुदूर्गातून हाकलून लावतो, असे आव्हान निलेश राणे यांनी दिले. भाषा बदलली नाही तर जिथे दिसशील तिथे फटके खायला घालणार अशी धमकीही त्यांनी दिली आहे. 


सिंधुदूर्गातील राज्यसभा खासदार नारायण राणेंच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्याने पुन्हा एकदा शिवसेना-राणे संघर्ष सुरू झाला आहे. नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच राणेंच्या पुत्राला पाडणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच, असा टोला राऊत यांनी भाजपाला हाणला आहे. कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी मातोश्रीवर फोन केल्याचे राणे यांनी सांगितले होते. त्या आधी राऊत यांनीदेखील राणे सारखे सारखे मातोश्रीवर फोन करत असल्याचे म्हटले होते. त्याला राणे यांनी महिनाभराने कबुली दिली होती. 


अमित शहा सिंधुदूर्गमध्ये येऊन जात नाहीत तोच शिवसेनेने आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील वैभववाडी नगरपरिषदेचे 7 नगरसेवक फोडले आहेत. हे नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे हार, गुच्छ घेणार नसल्याने हे नगरसेवक व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचे म्हटले होते. आता नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्यावरून चर्चा जोर धरू लागली आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. 

तुमचे पाचपट नगरसेवक फोडणार
वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र सोमवारी त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याने भाजपाला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान भाजपाने शिवसेनेला देखील आता इशारा दिला आहे. आमचे जेवढे नगरसेवक फोडले, त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार, असा इशारा भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

Web Title: Nilesh Rane angry over Narayan Rane non-matric comment of MP Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.