शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू शकतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 12:38 IST

अजित पवारांवरील धाडसत्रावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे.

मुंबई: मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी आज सकाळी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आणि त्यानंतर देवेंद्र यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आणि पत्रकार परिषदेत फडणवीसांचे ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मलिकांवर पलटवार केला आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले ?यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी आरोप केले. 'एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप करण्याची नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, हे केवळ ठाकरे-पवारच करू शकतात', अशी टीका किरीट सोमय्या यांनी केला.

तेव्हा गप्प का ?सोमय्या म्हणाले, नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून वानखेडेंवर आरोप करत आहेत. पण, वानखेडेंनी 2006 मध्ये मुस्लिम महिलेशी लग्न केलं. त्या आधी शेड्यूल कास्ट म्हणून ते नोकरीला लागले, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007 मध्ये आयआरएस म्हणून सिलेक्ट झाले, तेव्हा का गप्प बसला? 2015-16मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हाही  तुम्ही का गप्प बसला होता? कधी वानखेडेचं नाव काढायचं, कधी अमृता फडणवीसांवर टीका करायची, ही काय नौटंकी आहे? असा हल्ला त्यांनी चढवला.

लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्नसोमय्या पुढे म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्धही झालंय. पण, त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीसांवर इतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणाले.

पवारांनी उत्तर द्यावंसोमय्या पुढे म्हणाले की, अजित पवारांनी एक हजार कोटींची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचं उत्तर ठाकरे-पवारांनी द्यावं. सहा फटक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावं, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. तसेच, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1992-93 मध्ये दंगलीच्या काळात भाषणं केली होती. त्यांची भाषणं ऐकली असती तर त्यांना कळलं असतं दाऊद आणि पवारांचे संबंध काय आहेत? असा चिमटाही सोमय्या यांनी लगावला.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारAmruta Fadnavisअमृता फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडे