शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; भाजप नेते गणेश नाईकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 17:09 IST

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले. तसेच नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली.

ठळक मुद्देशिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे - आशिष शेलारनवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी - गणेश नाईक

मुंबई : नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले. तसेच नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली. (bjp leader ganesh naik demands navi mumbaikars should get corona vaccine free of cost)  आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आमदार  आशिष शेलार आणि गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

क्रिस्टल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्या प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण आर्थिकदृष्ट्या विचार करून सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे १५ लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये १५० कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचे स्वच्छ शहर झाले. या स्वच्छ शहराला आता भाजपला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनता भाजपलाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणCorona vaccineकोरोनाची लसGanesh Naikगणेश नाईकAshish Shelarआशीष शेलार