बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 03:20 PM2021-02-21T15:20:48+5:302021-02-21T15:23:11+5:30

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या महापौरांनीही लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले असून, भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

bjp leader ashish shelar slams thackeray govt over corona lockdown in mumbai | बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

Next
ठळक मुद्देआशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीकाआरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत - आशिष शेलारमागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान - आशिष शेलार

मुंबई : कोरोना संकट अद्यापही शमण्याचे नाव घेत नाही. कोरोना नियंत्रणात येत आहे, असे वाटत असतानाच महाराष्ट्रासह सहा राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या महापौरांनीही लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले असून, भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. (bjp leader ashish shelar slams thackeray govt over corona lockdown in mumbai)

करोनाचे रुग्ण वाढ आहेत. महापौर लॉकडाऊन करण्याचा इशारा देत आहेत. मात्र, बार, पब, नाईट लाईफ – नो लॉकडाउन. महाविकासआघाडी सरकारने ४० हजार लशींच डोस वाया घालवल्या आहेत, असा दावा करत पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते अयशस्वी ठरले आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. 

आरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत

राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत. आरोग्य मंत्र्यांना दंड, गुन्हे दाखल, मार्शल लॉ हवा आहे. मात्र, महाविकासआघाडी सरकारने नव्या पेंग्विन कारवान कायद्यावर १०० तास खर्च केलेत, अशी टीका आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

धक्कादायक! देशात तब्बल ७,६८४ प्रकारचे कोरोना; सर्वाधिक प्रकार दक्षिण भारतात

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कात सवलत असतानाही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची मागणी केली. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे आता समोर आले आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले, असे आशिष शेलार यांनी दुसऱ्या एका ट्विटमधून म्हटले आहे.

Web Title: bjp leader ashish shelar slams thackeray govt over corona lockdown in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.