शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 22:04 IST

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह लावून धरला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेबांना दिल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावेळी वारंवार म्हटलं होतं. त्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेलं सरकार म्हणजे जनादेशाची प्रतारणा असल्याची टीका त्यांनी केली. मला उद्धव ठाकरेंचं अतिशय आश्चर्य वाटतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांना दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. पण काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडून घेतलं असेल, असं मला वाटत नाही, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. बाळासाहेबांनी काँग्रेसवर कायम टीका केली होती. त्यांनी काँग्रेसला टोकाचा विरोध केला होता. मात्र आता उद्धव ठाकरे त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, असंदेखील फडणवीस लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. शिवसेना आमच्यासोबत असताना त्यांचा मान राखला जायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 'शिवसेना आमच्यासोबत असताना मातोश्रीवरुन आदेश द्यायचे आणि आम्ही ते आदेश पाळायचो. मात्र आता त्यांना सिल्व्हर ओक, ट्रायडंटवर जावं लागतं,' असा चिमटा फडणवीसांनी काढला. आता सामनाचे अग्रलेख बघा. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यांना काँग्रेसला खूश ठेवायचं आहे. याशिवाय जुन्या मतदारांनादेखील सांभाळायचं आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेतली आहे. तीन पक्षांचं सरकार फार काळ चालत नाही, हा इतिहास आहे, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस