शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 11:29 IST

१०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने परब यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे. 

नागपूर - भाजप नेते नारायण राणे यांच्या अटक आणि जामिन प्रकरणापासूनच राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. आता शिवसेना नेते, राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्तनागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस बजावली  आहे. त्यांना ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर, या नोटिशीला आपण कायदेशीर उत्तर देऊ, असे परब यांनी म्हणटले आहे. आता यावर विरोधी पक्षने देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (BJP leader Devendra Fadnavis commented on Anil Parab ED Notice)यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाली की नाही, यासंदर्भात आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती नाही. मात्र, ईडी असो किंवा सीबीआय हे त्यांच्या पद्धतीने आणि कायदेशीरपणेच काम करत असतात, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. खरे तर, १०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने परब यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे. 

ईडीची नोटीस आली, पण...; परिवहन मंत्री अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

अनिल देशमुख प्रकरणावर फडणवीसांचे भाष्य -फडणवीस यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भातही भाष्य केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या रविवारी सकाळपासून माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर तोंडसुख घ्यायलाही सुरुवात केली होती. यानंतर यावर सीबीआयनेही स्पष्टीकरण दिले. हाच धागा धरत फडणवीस म्हणाले, अशा बातम्या पेरून काहीच होणार नाही. सीबीआयने आता यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. एफआयआर रद्द व्हावा म्हणून जो खटाटोप चालला, त्याला अपयश आले आहे. प्रकरण कोणतेही असोत जे काही व्हायचं ते कायद्यानेच व्हायला हवे, असे आमचे म्हणणे आहे. हा कुणा एका व्यक्तीचा प्रश्न नाही तर कायद्याचा प्रश्न आहे. यामुळे खोट्या बातम्या पेरून कोणाचाही फायदा होणार नाही. सीबीआयचे काम कायदेशीर चौकटीत राहूनच  सुरू असते. असे फडणवीस यांनी म्हटले  आहे.परब यांना नोटीस मिळताच राऊत म्हणाले... - "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहे. क्रोनोलॉजी कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू...जय महाराष्ट्र", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Parabअनिल परबBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय