शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

…त्यामुळे शरद पवारांनी 'डबलगेम' केला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:35 IST

मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले असं फडणवीस म्हणाले.

मुंबई  - २०१९ च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. बहुमत आल्यानंतर संख्याबळ पाहून उद्धव ठाकरेंनी विरोधकांसोबत मिळून सरकार बनवले. त्यांनी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. आमच्या १० जागा जास्त आल्या असत्या तर हे घडले नसते. बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत बोलणे टाळले, फोन घेतले नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आले. तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला संपर्क झाला. ३ पक्षांचे सरकार बनू शकत नाही. त्यामुळे स्थिर सरकार येण्यासाठी भाजपा-राष्ट्रवादीने एकत्र आले पाहिजे असं म्हटलं असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही बैठक शरद पवारांसोबत घेतली. शरद पवारांनीही स्थिर सरकारसाठी भाजपा-राष्ट्रवादी एकत्र यावं ही गोष्ट मान्य केली. शरद पवारांनी ही जबाबदारी अजित पवार आणि माझ्यावर दिली. कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, पालकमंत्री कोण असतील ही यादी आम्ही बनवली. त्यानंतर शरद पवारांनी माघार घेतली. तेव्हा अजित पवारांनी इतक्या पुढे जाऊन पुन्हा माघारी फिरणार नाही अशी भूमिका घेतली मग आम्ही शपथविधी सोहळा घेतला. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही बहुमत चाचणी घेतली असती तर आमदार अपात्र ठरले असते. कारण अजित पवारांसोबत आमदार होते पण पक्ष नव्हता. त्यामुळे अजित पवार पुन्हा परतले. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला आणि शरद पवारांनी डबल गेम खेळला असा आरोप त्यांनी केला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शरद पवारांना किंगमेकर अन् सत्ता हाती हवी असावी

माझ्या राजकीय माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात डील झाली होती. भाजपाला जर १३० हून अधिक जागा आल्या तर ते तुम्हाला विचारणार नाही असं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपाचे उमेदवार असतील तिथे तुम्ही आम्हाला मदत करा. तुमच्या जागेवर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यामुळे दोघांना चांगल्या जागा येतील. त्यातून तुमचीही बार्गिनिंग पॉवर वाढेल असा समझौता झाला. निकालानंतर संख्या पाहून उद्धव ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधला. पण पवारांच्या पक्षातील लोकांना स्थिर सरकार हवे होते. त्यामुळे शरद पवारांनी आम्हाला संपर्क साधला. जर आमचे सरकार बनले तर तुलनात्मक एक मजबूत मुख्यमंत्री बनतील. त्यानंतर नड्डा, अमित शाह, मोदी हेदेखील असतील. पण महाविकास आघाडी सरकार बनले तर किंगमेकरही मीच असेन आणि सत्ताही माझ्या हाती राहील असं पवारांना वाटले असावे असं मला वाटतं असंही फडणवीस यांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे