महाराष्ट्र बजेट 2020: महिला वर्गासाठी पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प : चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 09:38 IST2020-03-07T09:36:29+5:302020-03-07T09:38:15+5:30
महिला सक्षमीकरण, सबलीकरण यासाठीची दृष्टी या संकल्पात दिसत नाही, हे दुर्दैवी असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र बजेट 2020: महिला वर्गासाठी पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प : चित्रा वाघ
मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनतर राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया येत असून, विरोधकांनी याच अर्थसंकल्पावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तर महिला वर्गासाठी पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
"घोषणांचा पाऊस, कुठे पडेल कुणास ठाऊक ? महिला वर्गासाठी पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्यातील महिला सुरक्षेची सद्यस्थिती लक्षात घेऊन ठोस उपाययोजना आणि त्यासाठी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा होती, मात्र सरकारने पूर्णपणे अपेक्षाभंग केला असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यात.
तसेच, विभागीय आयुक्तस्तरावर महिला आयोग कार्यालयाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र महिला आयोगासाठीच्या आणखी आवश्यक असलेल्या सक्षमीकरणाचे काय? महिला सक्षमीकरण, सबलीकरण यासाठीची दृष्टी या संकल्पात दिसत नाही, हे दुर्दैवी असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या.
घोषणांचा पाऊस, कुठे पडेल कुणास ठाऊक?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 6, 2020
महिला वर्गासाठी पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. राज्यातील महिला सुरक्षेची सद्यस्थिती लक्षात घेऊन ठोस उपाययोजना आणि त्यासाठी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा होती. मात्र पूर्णपणे अपेक्षाभंग या सरकारने केलेला आहे #Budget2020(१/४)