शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेनेचं बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 22:17 IST

sharjeel usmani: एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी (sharjeel usmani) प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देभाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवालशर्जिल उस्मानी प्रकरणी भाजप अधिक आक्रमकशर्जिल उस्मानीला तात्काळ अटक न केल्यास आंदोलनाचा भाजपचा इशारा

मुंबई : एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी (sharjeel usmani) प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. झोपेचं सोंग घेतलेलं ठाकरे सरकार शर्जिल उस्मानीला अटक कधी करणार, असा सवाल करत या प्रकरणी शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. (bjp leader chandrakant patil slams shiv sena over sharjeel usmani issue) 

नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी एकामागून एक ट्विट करत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

भविष्यात भाजप मोठे आंदोलन करेल

शर्जिलच्या अटकेसाठी प्रत्यक्षात या महाभकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून शर्जिल उस्मानीला अटक झाल्यास त्याला त्वरित जामीन कसा मिळेल हेच  या सरकाराचे प्राधान्य दिसत आहे. या लबाड सरकारने शर्जिल उस्मानीला तात्काळ अटक न केल्यास भविष्यात भाजपा याहूनही तीव्र आंदोलन करेल! हिंदूंचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही!!, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

“१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?”

शर्जिलच्या अटकेसाठी राज्यभरात आंदोलने

हिंदू समाजाबद्दल विखारी वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीच्या अटकेसाठी आज (गुरुवारी) राज्यात विविध ठिकाणी भारतीय युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. शर्जिलच्या मुसक्या आवळून आणणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियपणामुळे शर्जिलला अद्याप अटक करण्यात आली नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

दरम्यान, एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला असून, स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला. सुमारे तीन तास उस्मानीचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते, अशी माहिती स्वारगेट पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPuneपुणे