नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:54 PM2021-03-17T18:54:19+5:302021-03-17T18:56:30+5:30

Sachin Vaze: ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

bjp leader narayan rane demands that now chief minister uddhav thackeray should resign | नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देनारायण राणेंनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीएकामागून एक दोन ट्विट करत राज्य सरकारवर साधला निशाणासचिन वाझे प्रकरणी भाजप नेते आक्रमक

मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. (bjp leader narayan rane demands that now chief minister uddhav thackeray should resign)

नारायण राणे यांनी एकामागून एक दोन ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ''सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होणे. माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'', अशी मागणी करणारे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. 

राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको

पोलिसांवर राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको. राजकीय नेत्यांचे मार्गदर्शन असावे, पण पोलिसांमार्फत स्वत:चा स्वार्थ साधण्याची वृत्ती नसावी. हेच पोलीस अधिकारी चांगले काम करु शकतात. जेव्हा तुम्ही त्यांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करता. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी आपण राजकीय नेते म्हणून आपल्यात बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करु शकेल, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. 

'अशी' आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या हेमंत नगराळे यांची कारकीर्द

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: bjp leader narayan rane demands that now chief minister uddhav thackeray should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.