शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही पण...; भाजपाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:57 IST

राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून चांगलेच राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र राज्यपालांनी अद्याप मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद आमदारकीवर शिक्कामोर्तब केलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीबाबत विचारल्यावर उद्धव ठाकरे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त झाल्यावर आमची काहीच हरकत नाही. आमचा विरोध नाही. राज्यपाल त्यांचा अधिकार वापरतील अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या जागेवर भाजपा राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवर भाजपाचा विरोध नाही आणि हरकत देखील नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांची शिफारस करणं अवैध असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नाही. त्यामुळे इतका वेळ असताना एवढी घाई का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त सैनिकांची मदत घेण्यात यावी. होमगार्ड आणि एसआरपी रस्त्यांवर आणता येईल का याचा विचार व्हावा. ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळलेत तिथं लोकांना दहा दिवसांसाठी पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंची कीट्स पुरवण्यात यावी, असं मत देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तत्पूर्वी, राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस केली होती. आता कॅबिनेटने मंजुरी दिलेली असतानाही आमदारकीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी अजूनही आपल्या संमतीची मोहोर उठवलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली आहे. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्यानं या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी