शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीराजे यांना भाजपनं किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीयेत : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:01 IST

Chatrapati Sambhajiraje : यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली नसल्यानं छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली होती नाराजी. आपल्या राजीनाम्यानं मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊ असंंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.

ठळक मुद्देपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली नसल्यानं छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली होती नाराजी. आपल्या राजीनाम्यानं मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊ असंंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.

खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. "माझा राजीनामा देऊन मराठा  समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न  सुटणार असेल, समाजाला न्याय मिळत असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देईन," असे आक्रमक मत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं होतं. पक्ष म्हणून भाजपनं त्यांना किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. परंतु त्यांनी भेट दिली नसल्याचं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर पाटील यांनी भाष्य केलं. "छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आहेत. त्यांना भाजप कार्यालायात बोलावणार का? असं न करता त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर न्यावं असं मोदींनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारकी देण्यात आली. यानंतर त्यांची ओळख करून देण्यासाठी एकदा अमित शाह यांनी त्यांना प्रयागराजला राष्ट्रीय बैठकी त्यांचं अभिनंदन आणि ओळख करून देण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना चार्टर प्लेननं घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो," असं पाटील म्हणाले. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राज्यसभेवर आले आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण उभे राहुया असं अमित शाह म्हणाल्याचंही त्यांनी सांगितलं."त्यांना किती सन्मान दिला, त्यांची किती कामं मार्गी लावली, रायगड विकासासाठी किती निधी दिला हे ते सांगत नाहीयेत आणि इतरांना माहित नाही. यावेळी चार वेळा त्यांनी भेट मागितली आहे. परंतु त्यापूर्वी चाळीस वेळा त्यांनी मोदींशी भेट झाली आहे. कोरोनामुळे आणि दुसरं म्हणजे ज्यासाठी ते भेट मागतायत त्याचं समाधान माझ्याकडे नाही तर राज्याकडे आहेत या कारणांमुळे त्यांची भेट झाली नसावी. या भेटीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं काय केलं हे मी सांगत नाही. ते मोदींनी भेट दिली नाही म्हणून ओरडत आहेत. त्यांना कार्यालयात यायला लागू नये म्हणून त्याच मोदींनी त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली," असंही ते म्हणाले.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती