शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रांगेतील घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी; भाजप नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 16:47 IST

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, पूर्णत: बेकायदेशीर आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देआधी आपल्या नेत्यांना नियम शिकवा - अतुल भातखळकरकोरोना लसीकरणावरून भाजपची शिवसेनेवर टीकादातखिळी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य करावे - अतुल भातखळकर

मुंबई : ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, पूर्णत: बेकायदेशीर आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. (bjp leader atul bhatkhalkar slams shiv sena on corona vaccination)

कोरोना नियमावलीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेची मानसिकतेचा हा ढळढळीत पुरावा आहे, अशी टीका करत बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी नरेश म्हस्के आणि रविंद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिवसेनेवर हल्लाबोल

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटसह त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ''एकीकडे वनमंत्री संजय राठोड कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रचंड गर्दी जमवतात आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स यांसारख्या गरजूंना मागे सारून नेते स्वतःच कोरोनाची लस घेतात, अशी टीका त्यांनी केली आहे. 

भाजपला मोठा धक्का! खडसेंच्या पुढाकाराने १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

दातखिळी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य करावे

रांगेतील ही घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी घटना आहे. भाजप याविरोधात आवाज उठवेल. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांची दातखिळी बसलेली आहे, त्यांनी या सर्व प्रकरणांवर भाष्य करावे. अन्यथा भाजपला याविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराच अतुल भातखळकर यांनी यावेळी बोलताना दिला.

आधी आपल्या नेत्यांना नियम शिकवा

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असूनही कोरोनाविरोधातील लसीकरण कार्यक्रमात महाराष्ट्र मागे का आहे, हेच यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना आधी कोरोनाचे नियम शिकवावे, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरShiv SenaशिवसेनाthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे