शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"खाई त्याला खवखवे"; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 19:09 IST

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल असं म्हणाले होते रोहित पवार

ठळक मुद्देकदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं.मंगळवारी पहाटे रोहित पवारांनी दिली नवी मुंबईतील मार्केटला भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असं महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबाबत रोहित पवार म्हणाले. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला.कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल या वक्तव्याचा समाचार घेताना भातखळकर यांनी रोहित पवार यांना 'खाई त्याला खवखवे' असं म्हणत टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. काय म्हणाले होते रोहित पवार?"उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे," असं रोहित पवार महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. रोहित पवार यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अस आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे. याशिवाय, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmer strikeशेतकरी संपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्र