शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पवारसाहेब...महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय; MPSC आंदोलनावरून भाजप नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 15:13 IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

MPSC Exam Date ( Marathi News ) : स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्ट रोजी होणारी  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकलण्यासह अन्य काही मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यातील शास्त्रीनगर इथं आंदोलन करत होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. याच आंदोलनावरून आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

"विद्यार्थी हितासाठी आपण स्वतः तातडीने MPSCशी बोलला असतात तरी चालू शकले असते. पण तसे न करता आंदोलनात सहभागी व्हायचा इशारा आपण दिलात. महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय," असं म्हणत आशिष शेलार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

शेलारांचा हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, "मा. शरद पवार साहेब...काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करुन विद्यार्थ्यांचे तारखेबाबतचे म्हणणे MPSC च्या लक्षात आणू दिले होते. नुकताच तारीख बदलण्याचा निर्णय घोषित झालाही आहे. पण...MPSC ही संस्था स्वायत्त आहे, हे आपल्याला माहीत नसावे असे होणार नाहीच. परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारणच करायचे हे तुम्ही ठरवलेले दिसतेय. त्यामुळे आपल्याकडून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला सुरूवात केली गेली," अशा शब्दांत शेलार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी सरकारला काय इशारा दिला होता?

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार यांनी काल रात्री राज्य सरकारला इशारा दिला होता. "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार," असं पवार यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMPSC examएमपीएससी परीक्षाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेAshish Shelarआशीष शेलार