शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"मर्द, वज्रमूठ शब्द वापरून विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा औरंगाबाद शहराचं संभाजीनगर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 13:00 IST

BJP Keshav Upadhye And Thackeray Government : भाजपाने मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसेच शिवसेनेकडून एक पोस्टर ट्विट करण्यात आलं आहे. घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, असं म्हणत सभेला यायलाच पाहिजे, असं ट्विटमध्ये शिवसेनेनं म्हटलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल" असं म्हटलं आहे. तसेच केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्वीटमध्ये "महाराष्ट्रात येऊन औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून त्यांनी त्यांची विचारधारा स्पष्ट केलीय. ज्या छत्रपती संभाजी राजांना हाल हाल करून मारण्यात आलं. आज 14 मे सिंहाचा छावाच असलेल्या शंभू राजांची जयंती. गेल्या अनेक वर्षापासून हिंदूंच्या मनात जी भावना होती औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण व्हावं" असं म्हटलं आहे. 

"बाळासाहेबांची देखील तिच इच्छा होती. आज त्यांचे चिरंजीव राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसले आहेत. हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी मुंबईतील सभेची जाहिरातबाजी केली आहे. या सभेत मर्द, वज्रमूठ, गदाधारी, खंजीर असे शब्द वापरून विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल. अन्यथा हिंदुत्वावरील आपले पुरोगामी विचार ऐकण्यासाठी कुठल्याही हिंदु बांधवांना येण्याची गरज नाही" असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपानेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झाली आहे. याआधी देखील सभेपूर्वी तीन टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन भाष्य करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे भाषणातून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असणार आहे. मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा म्हणू, असं म्हणणाऱ्या राणा दाम्पत्य, केंद्र सरकार, सतत वाढणारी महागाई, केंद्रीय यंत्रणा आणि राज्यातील आगामी निवडणुका, असे विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करतील, असं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद