शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Keshav Upadhye : "पेंग्विन सेनाप्रमुखांनी पुन्हा पोकळ दंड पसरून गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले, नजरही भ्रष्ट झालीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:20 IST

BJP Keshav Upadhye Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुंबईवर गिधाडे फिरू लागलीत. मुंबई गिळायचीय, लचका तोडायला देणार का? नवीन नाही. शिवाजी महाराजांपासूनच्या काळापासून सुरू आहे. आम्हाला जमीन दाखवणार आहेत, ही गवताची पाती नाहीत, तलवारीची आहेत" असं म्हणत उद्धव ठाकरेंनीअमित शाह यांना खोचक टोला लगावला आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की" असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पेंग्विन सेनाप्रमुखांनी काल पुन्हा आपले पोकळ दंड पसरून त्याच गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले. त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक त्यांना कळत नाहीये. अमित शाह हे गरुड आहेत. किमान तेवढा तरी फरत पाहा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक, मैदान कशाला हवे?, फेसबुक लाईव्ह होतं की"

"एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते. आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केलं" असं देखील केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी "शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय तुम्हाला जर जायचं असेल तर आताच जा" असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. प्रत्येक शाखा उघडी असायला हवी. त्या शाखेत गटप्रमुखही असायला हवेत असंही म्हटलं आहे. 

"पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. अमित शाह यांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा" असं आव्हानही ठाकरेंनी दिलं आहे. तसेच "शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झालीय. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली... रक्तपात झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील. ते होऊ द्यायचे नाहीय म्हणून मी शांत राहण्यास सांगितले" असंही म्हटलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरे