शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचा जळफळाट होणं स्वाभाविक..."; संजय राऊतांच्या टीकेची भाजपाने उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:24 IST

BJP Keshav Upadhye Slams Sanjay Raut : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत ते बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

फडणवीसांच्या पत्रावर पुन्हा एकदा ठाकरे गटाने त्यांना इतर नेत्यांच्या घोटाळ्यांची आठवण करुन दिली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन फडणवीसांच्या पत्रावर अरे बापरे... अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, पिते दुध डोळे मिटुनी, जात मांजराची.. असंही म्हटलं आहे. संजय राऊतांच्या टीकेची भाजपाने आता उडवली खिल्ली उडवली आहे. 

"देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून स्पष्ट भूमिका मांडली, यावर तुमचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "सत्तेसाठी तुम्ही काय-काय केलंय आणि करताय, हे सगळे बघतोय" असं म्हणत खोचक टोला लगावला. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. "मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची... सरावल्या हातांनाही कंप का सुटावा..." असं म्हणत हल्लाबोल केला. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"अहो, संजय राऊत मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी पत्र लिहून स्पष्ट भूमिका मांडली, यावर तुमचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे.  मुळात ‘सत्तेपेक्षा देश महत्वाचा’ हे वाक्यच तुमच्या पचनी न पडणारे आहे, कारण सत्तेसाठी तुम्ही काय-काय केलंय आणि करताय, हे सगळे बघतोय. एवढी वैचारिक गुलामगिरी पत्करली की, टिपू सुलतानचे गोडवे गायला लागले…तुम्ही लिहिलेल्या ओळीच्या पुढची ओळ एकदा वाचा... खास उबाठा गटासाठीच आहेतमनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची... सरावल्या हातांनाही कंप का सुटावा..." असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकAjit Pawarअजित पवार