शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

राऊतजी, ‘हे’ तर गेल्या वर्षभराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं धोरण; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 13:27 IST

पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना भाजपकडून प्रत्युत्तरवर्षभर मुख्यमंत्र्यांचेही तेच धोरण - भाजपमुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले? - उपाध्ये

मुंबई: देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून, एका दिवसातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपार गेली आहे. कोरोना नियंत्रणासाठी कोरोना लसीकरणावर भर दिला जात असला, तरी लसींचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या कठीण काळातही आरोप-प्रत्यारोपांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. सामनामध्ये पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. (keshav upadhye replied sanjay raut over pm modi statement)

सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादावरून निशाणा साधण्यात आला. संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार होते, अशी टीका करण्यात आली होती. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केले आहेत. 

वर्षभर मुख्यमंत्र्यांचेही तेच धोरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या वर्षभराचे धोरण आहे.  कोरोनाचा हाहाःकार सुरू असताना महाराष्ट्रातील जनतेला तुमचं तुम्ही पहा, तुमचा आजार तुम्हीच निस्तरा असच तर मुख्यमंत्री सांगत आहेत, असा पलटवार उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

धक्कादायक! सिव्हिल रुग्णालयातून १२७० कोव्हिशिल्ड व ४४० कोव्हॅक्सिन लसींची चोरी

मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले? 

केंद्र सरकार मदत करत आहे. पण मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले? कोरोना लढाईत कोणती ठोस पावले उचलली? बेड, ॲाक्सिजन, रेमडेसीव्हर यासाठी काय नियोजन वर्षभर केले? काय मदत गोरगरीबांना दिली?, अशी प्रश्नांची सरबत्ती दुसऱ्या एका ट्विटमधून करण्यात आली आहे. वर्षभरातील बदल्या पहा, त्याऐवजी आरोग्याकडे लक्ष दिले असते तर दुरावस्था झाली नसती, अशी खोचक टीका यावेळी करण्यात आली. 

दरम्यान, १ मेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. जिल्हाबंदी, रेल्वे आणि मेट्रो प्रवासबंदी यांसारखे अनेक नियम जारी करण्यात आले आहेत. कडक निर्बंध लावूनही कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारण