“सत्ता हेच धोरण! २२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? अन् संघर्ष कधी केला?”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 07:00 PM2021-06-10T19:00:30+5:302021-06-10T19:04:41+5:30

NCP: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपने खोचक टीका केली आहे.

bjp keshav upadhye criticized ncp chief sharad pawar over his statement | “सत्ता हेच धोरण! २२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? अन् संघर्ष कधी केला?”

“सत्ता हेच धोरण! २२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? अन् संघर्ष कधी केला?”

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवार यांच्यावर भाजपची खोचक टीका२२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? संघर्ष केला कधी?केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून साधला निशाणा

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मराठा व ओबीसी आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट यांसारख्या अनेक मुद्द्यांवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करत भूमिका मांडली. यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली असून, सत्ता हेच धोरण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (bjp keshav upadhye criticized sharad pawar over his statement)

आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय, असे शरद पवार यांनी पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 

२२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला?

शरद पवारसाहेब, २२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा पण लगेच सत्तेसाठी मुद्दा सोडून दिला. संघर्ष केला कधी? जो निर्णय घेतला तो गुंडाळला व काँग्रेससोबत सत्तेत सहभागी. आताही ज्या शिवसेनाविरोधात लढलात, त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी म्हणजे सत्ता हेच धोरण, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

शिवसेना विश्वासाचा पक्ष!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तेव्हा अनेक शंका घेण्यात आल्या. पण शिवसेना विश्वासाचा पक्ष आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना नमूद केले. जनता पक्षाचे राज्य आले, त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेस पराभूत झाली. असे असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

“नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात”; भाजपचा पलटवार

दरम्यान, सलग १५ वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झाले. त्या आधी त्यांचे कतृत्व कधी दिसले नाही पण या आता ते जबाबदारीने आपले काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही. राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे, असे शरद पवार म्हणाले.
 

Web Title: bjp keshav upadhye criticized ncp chief sharad pawar over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.