नाशिक/मुंबई : देशाच्या नागरिकांच्या मोबाईल, कॉम्प्युटरच्या तपासणीसाठी 10 यंत्रणांना परवानगी दिल्याने देशभरातून टीका होत आहे. यामुळे काही हॅकरनी भाजपाची आयटी सेलची वेबसाईटच हॅक केल्याने खळबळ उडाली आहे.
सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेससह विरोधकांना पळता भुई थोडी करणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर त्यांची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद करण्याची वेळ आली आहे.
हॅक केल्याने वेबसाईटचे होम पेजवर मॅसेज दाखवण्यात आला होता. यामुळे आयटी सेलने तातडीने वेबसाईट दुरुस्तीचे काम हाती घेतले असून तसा संदेशही वेबसाईटवर दिसत आहे.करण्याचा धोका संभवणे शक्य असल्याने भाजपाच्या आयटीसेलेने वेबसाईट दुरुस्त करण्यासाठी काम सुरू केले आहे. तसा संदेशही या बेबसाईटवर दिसत आहे.
यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवया यांनी खुलासा करताना हा खोडसाळपणा असून, भाजपाच्या आयटी सेलची अशी कोणतीही स्वतंत्र वेबसाईट नाही. भाजपाच्या सर्व वेबसाईट सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
यावर एका ट्विटरकर्त्याने नागपूरच्या आयटी सेलचे अध्यक्ष केतन मोहितकर यांच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढून मालवय्या यांना खोटे बोलू नका असे सांगितले आहे. केतन मोहितकर यांच्या ट्विटरवरील प्रोफाईलवर भाजपाच्या आयटी सेलचा उल्लेख असून आयटी सेलची वेबसाईट www.bjpitcell.org हा अॅड्रेसही नोंद आहे.