शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:29 IST

AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं.

अकोला - अकोट नगरपरिषदेत भाजपाने एमआयएमसोबत युती केल्यानं राज्यभरात विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतले. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्‍यांनी यावर नाराजी व्यक्त केली तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावली. मात्र या घटनेवरून अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. माध्यमे आणि विरोधकांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही असं सांगत सावरकरांनी एमआयएमच्या नगरसेवकांनी पक्षाशी फारकत घेतल्याचा दावा केला.

आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, एमआयएमच्या विचारधारेशी फारकत घेत त्यांना सोडचिठ्ठी देत ४ नगरसेवक अकोट विकास मंचाकडे आले. या आघाडीत भाजपाचे ११ नगरसेवक आहेत त्यामुळे ही आघाडी भाजपाप्रणित आहे हे समजण्याइतके ते दुधखुळे नाहीत. या नगरसेवकांनी आमचे विचार स्वीकारले आणि एमआयएमचे विचार सोडले म्हणून आघाडी झाली. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नव्हता. AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं.

तसेच अजूनही आपण या नगरसेवकांना विचारून घेऊ, तुम्ही एमआयएमचे विचार सोडणार असतील तर आजही आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत. जर ते विचार सोडणार नसतील तर आमचा आणि त्यांचा संबंध नाही. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या विचाराशी खूप प्रामाणिक आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. AIMIM सोबत युती करण्याचा प्रयत्न झालाच नाही. पण झाला असेल तर ते आम्हाला दाखवून द्यावे. निश्चित संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.

दरम्यान, अकोट विकास मंचमध्ये नगरसेवक एकत्र येऊन युती झाली आहे परंतु एमआयएमसोबत युती झाली नाही. अकोट विकास मंच ही आघाडी कागदोपत्री आहे त्याला कुठलीही मान्यता नाही. जिल्ह्याचे त्याला समर्थन नाही. राज्यातील भाजपाचे त्याला समर्थन नाही. ही स्थानिक पातळीवर आघाडी झाली. हा एक प्रयोग होता. एमआयएमचे विचार सोडून ते ४ नगरसेवक सोबत आणण्याचा, मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी असंही आमदार रणधीर सावकर यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP not anti-Muslim; MLA twists on Akot AIMIM alliance.

Web Summary : Akola MLA clarifies BJP's Akot alliance: AIMIM corporators joined a BJP-backed front after abandoning their ideology. BJP welcomes Muslims leaving AIMIM's ideology. The alliance is local, lacks official backing.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस