शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:25 IST

काल संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला हे. आज संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. 

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

"संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला, शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य शाह यांनी शक्य नाही, यामुळे आता भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. तो अपमान आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. पण भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही, मधल्या काळात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवतानासुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं आपल्या सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्र हा जणू गांडूळांचा प्रदेश आहे असं भाजपाच्या वरिष्ठांना वाटू लागले आहे. उद्योगसुद्धा ते गुजराला घेऊन जात आहे, आता काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ज्या प्रकाराने उल्लेख केला, मला आता असं वाटत आता भाजपाचा बुरखा फाटला आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांच्या या वक्तव्यात उद्दामपणा होता. आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता, असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचे आहे. भाजपवाले आता नेहरुंवरुन आंबेडकरांवर आले आहेत. आता अशावेळी भाजपाला पाठिंबा देणारे रामदास आठवले, शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. शिंदे आणि अजित पवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का?  राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत खुलासा केला पाहिजे. एरवी अदानींचे नाव घेतल्यावर भाजपाचे सगळे नेते तुटून पडतात. महाराष्ट्र आणि देशाने आतातरी शहाणे झाले पाहिजे. त्यांना संविधान बदलायचे आहे, हे आम्ही सांगत होतो. भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळालं आहे. आता महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा, अशी मस्ती भाजपला चढली आहे.  ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेना