शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:21 IST

नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसून तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रभारींची बुधवारी घोषणा केली. मुंबईचे प्रभारी म्हणून मंत्री आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका या तिन्ही निवडणुकांसाठी हे नेते प्रभारी म्हणून काम पाहतील.

जळगाव जिल्ह्यातील नेते असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचवेळी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे जळगाव जिल्हा सोपविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातीलच असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे नंदुरबारचा प्रभार असेल.

बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे, तर लातूरमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे प्रभारी असतील. खा धनंजय महाडिक -कोल्हापूर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड - जालना,  खा. अशोक चव्हाण नांदेड,  डॉ. संजय कुटे अमरावती, मंत्री गणेश नाईक ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे शहर व पुणे ग्रामीण, तर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अहिल्यानगर शहर व ग्रामीण भागाचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

आ. डावखरे यांना संधी

आ. निरंजन डावखरे यांच्याकडे रत्नागिरीचे, तर आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे रायगडचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. सिंधुदुर्गची जबाबदारी मंत्री नितेश राणे यांच्याकडे, तर बुलढाण्याचे मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे बुलढाणा, तर आ. रणधीर सावरकर हे अकोलाचे प्रभारी असतील.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Appoints Incharges: Shelar for Mumbai, Munde for Beed.

Web Summary : BJP announced election in-charges for local bodies. Ashish Shelar leads Mumbai, Pankaja Munde Beed. Key leaders assigned responsibilities across Maharashtra districts for upcoming polls.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेAshish Shelarआशीष शेलार