शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:38 IST

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपाचं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर

मुंबई: व्यंगचित्रातून राज्य सरकारवर वारंवार निशाणा साधणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरेंना आता भाजपानं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणूक जवळ आली असो वा त्या निवडणुकीत मनसेचं पानिपत झालेलं असो, राज ठाकरे फक्त व्यंगचित्रच काढत असतात, असा टोला भाजपानं व्यंगचित्रातून लगावला आहे. महाराष्ट्र भाजपानं ट्विटरवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. भाजपानं व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंची जोरदार खिल्ली उडवली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाही राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटण्यात मग्न आहेत, असं व्यंगचित्र भाजपानं प्रसिद्ध केलं आहे. 'साहेब, लोकसभा निवडणूक जवळ आली!', 'साहेब, विधानसभा निवडणूक जवळ आली!', असं मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंना सांगत असतानाही मनसेप्रमुख व्यंगचित्र काढण्यात व्यस्त आहेत. यानंतर कार्यकर्ते 'साहेब, आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही', असंही राज यांना सांगताना दाखवण्यात आले आहेत. मात्र तरीही राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यात गढून गेले आहेत. ते कार्यकर्त्यांकडे पाहतदेखील नाहीत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्र भाजपानं प्रसिद्ध केलेलं हे व्यंगचित्र अनेकांनी रिट्विट केलं आहे. साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?, असा प्रश्न भाजपानं व्यंगचित्रासोबत विचारला आहे.राज्यातील दुष्काळ, मोदींची आश्वासनं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावरील कोट्यवधींचा खर्च, सीबीआयमधील वाद यासारख्या अनेक मुद्यांवरुन राज ठाकरेंनी आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारवर व्यंगचित्रातून हल्ला चढवला आहे. दिवाळीत राज ठाकरेंनी मोदी आणि फडणवीस सरकारला सातत्यानं लक्ष्य करत फटाके फोडले होते. त्यांच्या व्यंगचित्रांना सोशल मीडियाकडून चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता. कालच राज ठाकरेंनी अवनी वाघिणीच्या हत्येवरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेElectionनिवडणूक